२०१३: एक क्रिकेट टूर्नामेंट, एक टीम आणि एक अविस्मरणीय फायनल, आणि वंड्याची प्रेम कहाणी

कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील मित्र, क्रिकेट टूर्नामेंट, सेमीफायनल आणि थरारक फायनलची आठवण.

२०१३: शेवटच्या वर्षाची सुरुवात

2013 साल होतं. दोन वर्षांच्या कॉलेज ड्रॉपनंतर मी फायनली शेवटच्या वर्षाला ॲडमिशन घेतलं होतं. या शेवटच्या दोन वर्षांनी मला पूर्णपणे बदलून ठेवलं होतं.

2013 ला जेव्हा शेवटचं वर्ष चालू झालं, त्यावेळी मी एक ड्रॉप लागून आलेला विद्यार्थी होतो. त्यामुळे त्या वर्गामध्ये माझे कोणीही मित्र नव्हते. पण माझ्याव्यतिरिक्त अजून चार-पाच जण होते, जे आधीच्या वर्षांमध्ये ड्रॉप लागून आले होते. त्यात होते मंगेश = मंग्या, अनिकेत = आंड्या, मनोज = गोट्या, राजेश. काही जण त्याच batch चे होते आणि हुशार, पण माझ्या एरिया मध्ये राहायचे त्यामुळे ते पण मित्र झाले अजय = पप्या, वरून = वंड्या.

त्या वर्गामध्ये मला कोणी ओळखत नसल्यामुळे माझी आपसूकच या ड्रॉप लागलेल्या मुलांसोबत मैत्री झाली. आयुष्यभर वर्गामध्ये पुढे बसणारा मी आता बॅकबेंचर झालो होतो. अभ्यासाचा पार बोजवारा झाला होता. अभ्यास करायची इच्छा संपली होती. फक्त कॉलेज संपवायचं, ग्रॅज्युएशन पूर्ण करावं म्हणूनच ॲडमिशन घेतलं होतं.

माझं अभ्यासामध्ये लक्षच नव्हतं. माझा कॉलेजमधला वेळ हा जिमखान्यात, खेळण्यात यातच जात होता.

जिवलग मित्र आणि टीमची सुरुवात

तर माझे जिवलग मित्र झाले होते राजेश, मंग्या, वंड्या, पप्या, आंड्या, वंड्या हे लोक. प्रत्येकाला काहीतरी मैदानी खेळाचा नाद होता. अर्ध्याहून अधिक ही पाड्यातून आलेली मुलं होती. त्यामुळे वर्गातली बाकीची जी मुलं होती, ती थोडीशी आम्हाला दबकून राहायची. पण आम्ही कोणाशी कधी भांडलो नाही, कोणाच्या खोड्या काढल्या नाहीत. फक्त ती मुलं त्यांच्या दुनियेत होती आणि आम्ही आमच्या दुनियेत होतो. कामापुरतं आमचं त्यांच्याशी बोलणं व्हायचं. त्यापेक्षा जास्त त्या मुलांसोबत आमचं engagement नव्हतं.

आता बाकीची गोष्ट, आधीची दोन वर्षं याबद्दल काही सांगत नाही. जी महत्त्वाची स्टोरी मला सांगायची आहे, ती सांगतो.

पप्या आणि वंड्या हे तिघं आमच्या ग्रुपमधली हुशार मुलं होती आणि ती त्याच वर्गातली होती. नापास वगैरे काही झाली नव्हती.

पप्याला माहीत होतं की दरवर्षी कॉलेजच्या टूर्नामेंट वगैरे होतात. तर त्यावर्षी पप्याला समजलं की फॉर्म आलेले आहेत. त्याआधी पप्या किंवा आमच्यापैकी कोणीही आधीच्या दोन वर्षांमध्ये टूर्नामेंट खेळलं नव्हतं. पण पप्याचा एक मित्र होता कॉमर्समधला. कारण पप्या आणि वंड्या हे दोघं अकरावी-बारावी कॉमर्समध्ये होते आणि कॉमर्समधून ते आयटीमध्ये आले होते.

पप्याचा मित्र अक्षय कॉलेजमध्ये कॉमर्स फिल्डमध्ये होता. अक्षयने पप्याला सांगितलं, “अरे, तू टाकतोस का टीम?”

तर पप्या म्हणाला, “बघतो, वर्गातून कोणी टाकतंय का.”

पण वर्गामध्ये कोणी इंटरेस्टेड नव्हतं आणि जनरली आम्हीही इंटरेस्टेड नव्हतो. पण पप्या म्हणाला, “च्यायला, ५०-५० रुपये तर टाकायचे आहेत. टाकूया आपण. हरलो तर हरलो, जिंकलो तर जिंकलो.”

आता यामध्ये cricket खेळणारे होतो मी, पप्या आणि आंड्या. आम्ही तिघंच असे होतो, जे आधी मंडळात, टीम्स, tournament मध्ये वगैरे क्रिकेट खेळलो होतो लहानपणापासून. त्यातल्या त्यात पप्या हा मोस्टली कबड्डी खेळला होता. क्रिकेट कमी आणि कबड्डी जास्त खेळला होता. आंड्या वगैरे क्रिकेट खेळायचा. मंग्या जिमचा प्लेयर होता, म्हणजे जिम करायचा वगैरे. वंड्या असाच ठीकठाक, बऱ्यापैकी खेळायचा. बाकी चपळ होते पण क्रिकेट असं जास्त खेळले नव्हते.

पप्या एक दिवस कॉलेजच्या ब्रेकमध्ये आला आणि म्हणाला, “क्रिकेटला फॉर्म टाकतोय. आपली टीम टाकतोय. आपल्या वर्गामधून कोणी टाकत नाहीये. मला म्हणाले की तुमच्या class मधून एक टीम टाका, म्हणून मी पण टाकतोय. जाऊ दे, टाइमपासमध्ये खेळू. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो.”

मग आम्ही रेडी झालो. ५०-५० रुपये काढले आणि आमच्या टीममध्ये हेच प्लेयर होते— पप्या, मी, मंग्या, आंड्या, वंड्या, मनीष(आमच्या ग्रुप मधला नव्हता) आणि गोट्या. आणि एक दोन जण.

तर आम्ही अशी टीम टाकली.

टूर्नामेंट चालू झाली…

पहिली मॅच: बॉक्स क्रिकेटचा पहिला अनुभव

आमची पहिली मॅच होती एका बीसीए टीमसोबत. मला त्या बॉक्स क्रिकेटचा एक्सपिरियन्स नव्हता आणि त्यामुळे समोरची टीम कशी आहे, काय आहे, याचंही काही ज्ञान नव्हतं. मी आधी क्रिकेट बऱ्यापैकी खेळलो होतो. लहानपणापासून क्रिकेटच्या टूर्नामेंट्स वगैरे खेळत आलो होतो. पण बॉक्स क्रिकेट जास्त खेळलो नव्हतो. इथे रुल्स वगैरे वेगळे होते.

आमच्या पहिल्या मॅचच्या तीन-चार दिवस आधी आम्ही कॉलेजच्या समोर असलेल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस केली. याच्यामध्ये बॉलिंगचे नियम वेगळे होते. बॅटिंग पूर्णपणे ओपन होती, फक्त बॉक्सच्या बाहेर बॉल गेला की आऊट होतं. बॉलर्सना खूप जास्त रुल्स होते. बॉलिंग करताना हात असा नको, तसा नको, असे भरपूर नियम होते. बॅट्समनला मात्र फक्त एकच नियम होता—बॉक्सच्या बाहेर डायरेक्ट बॉल गेला की आऊट.

पाच ओव्हरच्या मॅचेस होत्या. त्याच्यामध्ये एक जण फक्त दोन ओव्हर टाकू शकणार होता आणि बाकीच्या तीन ओव्हर एक-एक ओव्हर अशा टाकायच्या होत्या. म्हणजे आम्हाला टोटल चार बॉलर लागणार होते.

माझी बॉलिंग चांगली होती, त्यामुळे दोन ओव्हर मी टाकणार असं ठरलं होतं. वंड्या, मनीष हे जास्त क्रिकेट न खेळणारे मुलं होते. त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. उरलेली एक ओव्हर पप्या टाकणार होता. तर असे आमचे चार बॉलर झाले.

बॅटिंगला ओपनिंगला मी येणार होतो आणि माझ्यासोबत नॉन-स्ट्राइकला पप्या होता. पप्याच्या नंतर बॅटिंग करायला मंग्या येणार होता. मंग्याच्या नंतर आंड्या आणि मग उर्वरित टीम. अशी आमची बॉलिंग आणि बॅटिंगची लाईनअप होती.

बाकीचे जे खेळाडू टीममध्ये होते, त्यांना थोडंफार खेळता येत होतं. फिल्डिंगमध्ये आमचा आंड्या बेस्ट होता. त्याच्यासोबत मी आणि पप्या होतो. वंड्या आमचा विकेटकीपर होता. गोट्या आणि मनीष हे मिडला उभे होते. मी बॉलरच्या लेफ्ट-राईटला वगैरे असायचो. बाऊंड्रीवर पप्या आणि आंड्या असायचे. ज्यावेळेस पप्या बॉलिंगला यायचा, त्यावेळेस मी बाऊंड्रीवर फिल्डिंगला जायचो.

तर प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर आमची पहिली मॅच होती.

मॅच अगदीच सिम्पल झाली आमच्यासाठी. कारण समोरची जी टीम होती, त्यांच्यामध्ये जवळपास क्रिकेट खेळणारं कोणीच नव्हतं. पहिल्याच मॅचमध्ये आम्ही पाच ओव्हरमध्ये १५९ रन मारले होते. मला अजूनही आठवतं, त्याच्यामध्ये मी ६५ रन केले होते. पप्यानेही बऱ्यापैकी रन केले होते आणि आमच्या फक्त दोनच विकेट गेल्या होत्या.

एवढे रन होण्यामागचं कारण म्हणजे जवळपास प्रत्येक बॉलवर रन जात होते आणि समोरच्या टीमने भरपूर नो-बॉल, वाईड वगैरे टाकले होते.

त्यात एक ‘सुपर ओव्हर’चा कन्सेप्ट होता. बॅटिंग टीम डिसाईड करायची की त्यांना कोणती ओव्हर सुपर ओव्हर म्हणून खेळायची आहे. त्या सुपर ओव्हरमध्ये जितके रन होतील, त्याचे डबल रन कन्सिडर केले जाणार होते. त्यामुळे आमचा स्कोअर १५९ पर्यंत गेला.

समोरच्या टीममध्ये ना कोणी व्यवस्थित फिल्डर होता, ना कोणी बॉलर. आणि ज्यावेळेस आम्ही बॉलिंगला आलो, तेव्हाही मॅच आमच्यासाठी अगदीच सिम्पल झाली. त्यांची टीम २ ओव्हर मध्ये ३३ रन करून ऑल आऊट झाली.

पण त्या एका मॅचनंतर आमचा आत्मविश्वास भयंकर वाढला.

तर अशी आमची पहिली मॅच होती.

First match scorecard

दुसरी मॅच आणि वाढलेला आत्मविश्वास

आमची दुसरी मॅचही झाली. मला खरं तर त्या मॅचचा स्कोअर वगैरे काही आठवत नाही. समोरची टीम कोणती होती, हेही आता आठवत नाही. पण आम्ही ती मॅच जिंकलो. बऱ्यापैकी झाली होती ती मॅच.

त्या दोन्ही मॅच झाल्यानंतर आम्ही मुलुंड स्टेशनला असंच पार्टी करायला गेलो होतो. पार्टी म्हणजे काय, सँडविच खायला!

सँडविच खाताना पप्या मला बोलला, “यार भेंचोत, आपण मस्करी-मस्करीमध्ये टीम टाकली आणि आईची गांड यार एवढं भारी kheltoy आपण, आपल्याला माहीतच नव्हतं!”

मी बोललो, “तर आपण फायनलला!”

मंग्या बोलला, “भेंचोत, फायनल नंतर बघू. पुढच्या मॅच कशा होतील ते बघू.”

प्रॅक्टिस वगैरेबद्दल बोलत असताना आम्ही वंड्याला बोललो, “भेंचोत, जरा तुझी बॉलिंग सुधार. काय भेंचोत, किती रन देतोस रे तू? काय लवड्या वाटायला आलाय का तू?”

तो बोलला, “अरे, एवढं सिम्पल तर जिंकलो आपण!”

“अरे, पण पुढच्या राऊंडला टफ टीम असतील. तेव्हा पण काय तू अशीच बॉलिंग टाकणार काय?”

तो बोलला, “करतो, करतो. प्रॅक्टिस करतो.”

अशी मजाक-मस्ती करत तो दिवस आमचा संपला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा प्रॅक्टिसला आलो.

क्वार्टर फायनल: एक अविस्मरणीय प्रसंग

आम्ही क्वार्टर फायनलमध्ये गेलो होतो. क्वार्टर फायनलच्या मॅचबद्दल तसं मला फार काही आठवत नाही. पण त्या मॅचमधल्या दोन प्रसंगामुळे मात्र ती मॅच अजूनही आठवते. एक म्हणजे मंग्या ने तुफान batting केली होती.

आणि दुसरी म्हणजे, समोरच्या टीमच्या एका बॅट्समनने मारलेला बॉल माझ्या कपाळावर इतक्या जोरात लागला होता की पुढचे पंधरा दिवस माझं कपाळ दुखत होतं. टेनिसचा बॉल होता, पण इतक्या जोरात माझ्या कपाळावर लागला होता की तो प्रसंग अजूनही आठवतो.

ती मॅच थोडी टफ झाली होती, पण आम्ही ती मॅच जिंकलो.

अक्षयची क्वार्टर फायनल आणि पहिला वाद

टीवाय बीकॉममधला पप्याचा जो मित्र होता, अक्षय, तो आमचाही मित्रच होता. कॅरम वगैरे खेळताना आणि जिमखान्यात तो आमचासोबत असायचा. पण पप्याचा तो खूप जवळचा मित्र होता. तर, अक्षय वगैरे यांची क्वार्टर फायनल मॅच BMSच्या टीमसोबत चालू होती.

ती मॅच चालू असताना तिथे BMMच्या टीमची मुलंही होती. BMMच्या टीमचा जो मेन प्लेयर होता, तो एक गुजराती मुलगा होता — अमित. तो त्यांच्या टीमचा हुकमी प्लेयर होता. त्याचे मित्र हे BMSच्या टीममधल्या मुलांचेही मित्र वगैरे होते, त्यामुळे ते BMSच्या टीमला चिअर करायला आले होते.

अक्षय वगैरे यांची बॅटिंग चालू होती आणि ही BMMची मुलं BMSच्या टीमला चिअर करायला लागली. जास्त आरडाओरडा करायला लागली, बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन भंग करायला लागली. मग शिव्या देणं किंवा उगाच चिडवणं वगैरे चालू झालं.

आता हे अक्षय वगैरेही आमच्यासारखेच पाड्यातली पोरं होती. त्यामुळे थोडंसं इकडून-तिकडून झालं आणि मग तिथे गरमागरमी वाढली. थोडा वाद झाला, भांडण झालं आणि मग शिव्याशाप वगैरे सुरू झाले.

अंपायर वगैरे मध्ये पडले. त्यांनी त्यांना समजावलं, यांना समजावलं आणि पुन्हा मॅच सुरू झाली.

अक्षय वगैरे मॅच जिंकले. पण त्यानंतर BMMची मुलं आणि अक्षयच्या बीकॉमच्या टीममधली मुलं यांचं भांडण कॉलेजच्या बाहेर आलं…

आम्ही होई match बघायला नव्हतो. नंतर खबर समजली होती.

सेमीफायनल: राड्याची सुरुवात

आमची टीम सेमीफायनलला गेली होती आणि लकीली आमची मॅच ही BMMच्या त्याच टीमसोबत होती, ज्या टीमची अक्षयच्या टीमसोबत ठसन झाली होती, भांडण झालं होतं.

दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे कॉलेजला आले, तेव्हा अक्षयने पप्याला फोन केला. पप्याला बोलला, “आई घाल्या, तुझी टीम घेऊन ये Canteen मध्ये.”

तर आम्ही सगळे आणि अक्षयची टीम कॅम्पसमध्ये कॅन्टीनच्या इथे भेटलो. तिथे भेटल्यानंतर आमच्या अशाच गप्पा चालू झाल्या. त्यामध्ये अक्षय काल काय झालं ते सांगायला लागला.

अक्षय लालबुंद चेहरा आणि डोळ्यांतून आग ओकत बोलायला लागला “भेंचोत, तो BMMचा अमित जो आहे ना, त्याच्या गांडीत जाम kida आहे. झवाडा साला! काल उगाचच गांडीमध्ये बोट घालत होता. काही गरज नसताना उगाचच चिडवत होता. आईचा भोसडा त्याच्या! यांची गांड मारायची. आता पप्या, तुमची मॅच त्यांच्यासोबत आहे ना? भेंचोत, काहीतरी राडा करायचा आहे.”

मी बोललो, “राडा तर झाला पाहिजेल. पण कॉलेज आहे. उगाच लफडी झाली तर काढतील बिडतील कॉलेज मधून च्यायला!”

पप्या बोलला, “अरे, आम्ही काही नाही करू शकत पण अक्षय तू येणं तुमची पोरं घेऊन. पाठी cheer करत आई झवून टाका त्यांची. तुम्हाला कोण शाट बोलणार आहे काही. तुमची थोडी match आहे ती.”

अक्षयचं डोकं तिथे पेटलं होतं. पण आम्हीही त्याचे मित्र असल्यामुळे आणि दोन मित्रांच्या टीम असल्यामुळे आम्हालाही थोडीशी ती गर्मी आली होती. आता या BMMच्या टीमची आपण चांगलीच लावायची, असं डोक्यात आलं होतं.

मग काय, सेमीफायनलचा दिवस उगवला.

सेमीफायनल: मैदानावरचा राडा

सकाळी प्रॅक्टिस वगैरे झाली आणि मॅचची वेळ झाली. मागच्या वेळेला अक्षयच्या टीमची, कॉमर्सच्या वर्गातली सगळी मुलं-मुली वगैरे आता आम्हाला चिअर करायला आली होती. तिकडे BMMच्या टीमला BMSची टीम चिअर करायला आली होती.

मॅच सुरू झाली.

अक्षय वगैरे आधीच द्वेषाने पेटले होते. तो अमित बॉलिंगला आला की जोरदार चिडवणं सुरू झालं.

“gujarati गांडीचा आलाय!”

“फाफडा-जिलेबी आला!”

“याला पाठवा गुजरातला!”

अशा घोषणा चालू झाल्या, शिव्या वगैरे द्यायला चालू झाल्या.

त्या घोषणा सुरू झाल्यावर तो पार वैतागला होता. त्याला नीट बॉलिंगही करता येत नव्हती. त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे भंग झालं होतं. त्याचा चेहरा एकदम लालबुंद झाला होता. ज्या प्रकारे ही सगळी पोरं त्याला चिडवत होती, ज्या प्रकारे त्याला शिव्या घालत होती, त्यामुळे तो भयंकर वैतागला होता.

त्याचे मित्र तसं काही जास्त बोलत नव्हते. पण इकडे कॉमर्सच्या मुलांनी पूर्ण लाज-लज्जा वगैरे सोडून दिली होती. आमची मॅच असल्यामुळे आम्ही स्वतः काही जास्त बोलत नव्हतो. पण कॉमर्सवाल्यांनी चिडवताना पूर्ण लाज-लज्जा सोडली होती. शिव्या आणि वाट्टेल त्या प्रकारे त्याला चिडवणं सुरू होतं.

त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला होता आणि त्याचं लक्ष मॅचमधून पूर्णपणे गेलं होतं. त्याच्याकडून वाईड पडत होते, नो-बॉल पडत होते.

तो ज्यावेळेस बॅटिंगला आला, तेव्हाही तेच चालू होतं. समोरचा प्लेयर हातातून बॉल टाकणार, तेवढ्यात हे मागून एकदम जोरात ओरडायचे,

“ए गुजराती!”

“फाफडा-जिलेबी! हांडवा खातो कि आमचा आंडवा खातो.”

असं त्याला सतत चिडवत होते.

तरी तो अल्टिमेट खेळला.

पण शेवटी आम्ही मॅच जिंकलो.

मॅच संपल्यानंतर मात्र त्याला स्वतःला कंट्रोल करता आलं नाही. त्याने बॅट घेतली आणि भिंतीवर धना-धना आपटली. त्यानंतर तो थेट अक्षयच्या अंगावर धावून गेला.

अक्षयवर धावून गेल्यानंतर ग्राउंडवरच मारामारी, भांडण वगैरे सुरू झालं. आम्ही त्याच्यामध्ये जास्त पडलो नाही. आम्ही फक्त दोघांना आडवायचं, भांडण थांबवायचं काम वगैरे केलं.

पण ती मॅच झाली भयंकर मजेशीर.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—आम्ही ती मॅच जिंकलो होतो.

आम्ही फायनलमध्ये गेलो होतो.

फायनलची तयारी आणि सायलीला निमंत्रण

त्याच दिवशी अक्षय यांच्या टीमची सेमीफायनल मॅच झाली आणि तेही ती मॅच जिंकले. अक्षयची टीम, म्हणजे टीवाय बीकॉमची टीम, तीसुद्धा फायनलला गेली.

आता फायनलमध्ये TYBscITआणि TYBCom अशा दोन टीम होत्या. दोन्ही टीममध्ये आम्ही एकमेकांचे मित्र होतो.

आमचा कॅप्टन होता पप्या आणि त्यांचा कॅप्टन होता अक्षय.

फायनलला अजून जवळपास दोन दिवस होते. त्यामुळे आम्ही प्रॅक्टिसला वगैरे सुरुवात केली. सेमीफायनलमध्ये वंड्याची बॉलिंग चांगली पडली होती, त्यामुळे वंड्याला वेगळाच जोश आला होता. तो खूप जास्त कॉन्फिडंट झाला होता. पप्यानेही सेमीफायनलमध्ये बॅटिंग चांगली केली होती. मी मात्र सेमीफायनलला झिरोवर आऊट झालो होतो, हे मला अजूनही आठवतं.

तर आमचं प्रॅक्टिस सेशन ठरलं होतं. आम्ही सगळे प्रॅक्टिसला जमलो. सेम कॉलेजच्या बाहेरच प्रॅक्टिस करणार होतो. शनिवार होता का रविवार होता ते आता नक्की आठवत नाही, पण सुट्टीचा दिवस होता. आम्ही सगळे कॉलेजच्या बाहेर प्रॅक्टिस करायला जमलो होतो.

अशीच बॅटिंगची प्रॅक्टिस चालू होती, बॉलिंगची प्रॅक्टिस चालू होती. वंड्याला कॉन्फिडन्स आला होता. तो मला बोलतो, “सागऱ्या, बॉलिंग एक नंबर झाली यार माझी!”

मग थोड्या वेळाने मला बोलतो, “यार, सायलीला बोलवू का यार फायनल बघायला?”

मी बोललो, “का रे?”

सायली ही वंड्याची मैत्रीण होती. त्याला ती खूप आवडायची. त्यामुळे त्याला तिला इम्प्रेस करायचं होतं. ती आमच्या कॉलेजमध्ये नव्हती. ती ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये होती. पण हे क्लासला सोबत होते.

तर वंड्या परत बोलतो, “यार, सायलीला बोलवू का?”

मी बोललो, “तुला बोलवायचं असेल तर बोलव. पण ती येईल का?”

पप्या बोलतो, “अरे वंड्या, नको. कशाला बोलवतोय उगाच? आधीच्या मॅचमध्ये वगैरे चांगलं हागून ठेवलंयस तू.”

वंड्या बोलतो, “नाय यार! सेमीफायनल बघितली ना? काय टवका खेळलो आहे मी! समोरची टीम इतकी टफ होती, तरी पण मी किती जबरदस्त बॉलिंग टाकली!”

मी बोललो, “टाकली. पण त्याच्या आधीच्या तीन मॅचमध्ये तू काय एवढी चांगली नाही टाकलीस. आणि एका मॅचमध्ये तर तू पार हागला होतास. पार जुलाब केलेलीस.”

त्यावर वंड्या बोलतो, “यार, फायनलमध्ये चांगली ओव्हर पडली, बॅटिंग वगैरे भेटली आणि चांगली झाली तर?”

आम्ही बोललो, “आपलं काय चाललंय आणि तुला कसली पडली आहे! बोलव च्यायला आम्हाला काय, तीला खेळवायला नको लाउस match मध्ये फक्त. नाहीतर बोलशील सायली आणि मी ओपनिंग ला batting करायला जातो.”

वंड्या बोलतो, “यार, मी बोललो ना तर तिला समजेल की मी तिला मला बघायला बोलवतोय. मॅच बघायला ये वगैरे मी स्वतः बोललो, तर तिला तसं वाटेल ना. तुम्ही बोलवा ना की फायनल मॅच आहे, पप्या बोलवतोय वगैरे. यार मला ती सायली फार आवडते यार फायनलला माझा परफॉर्मन्स भारी झाला ना मी प्रपोज वगैरे करेन तिला. भेंचोत, मित्राची एवढी मदत नाही करणार काय?”

मग वंड्याने पप्याला चांगलंच ब्लॅकमेल केलं.

मी क्लासला वगैरे जात नव्हतो आणि पप्या, वंड्या तिच्यासोबत क्लासमध्ये होते. त्यामुळे पप्यानेच सांगितलं. त्याने तिला असंच इन्व्हाईट केलं, “आमच्या कॉलेजमध्ये फायनल मॅच आहे. बघायला येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही.”

अशा प्रकारे पप्याने तिला इन्व्हिटेशन दिलं.

तर असंच आमचं फायनलचं प्रिपरेशन वगैरे चालू होतं. माझी आणि पप्याची प्रॅक्टिस चालूच होती आणि बॉलिंग चांगली पडत होती. बॅटिंगमध्ये मात्र सेमीफायनलला मी झिरो रनवर आऊट झालो होतो.

आणि मग फायनलचा तो दिवस उजाडला…

फायनलचा दिवस

फायनलच्या मॅचचा दिवस उजाडला.

संपूर्ण टीम प्रॅक्टिस करून वगैरे फुल कॉन्फिडन्समध्ये आली होती. अक्षयची टीमसुद्धा टॉप टीम होती. त्यांनी याआधीसुद्धा बॉक्स क्रिकेट वगैरे खेळलं होतं. आम्ही मात्र अंडरडॉगसारखे वर आलो होतो. कारण आम्ही आमची टीम कोणत्याही हेतूने किंवा फायनल जिंकायच्या उद्देशाने टाकलीच नव्हती. जस्ट टाइमपास म्हणून टीम टाकली होती आणि आम्हाला कल्पनाही नव्हती की आपण इतका चांगला परफॉर्मन्स करू.

माझी आणि पप्याची बॉलिंग-बॅटिंग खूप चांगली होत होती. मंग्या खूप चांगली बॅटिंग करत होता. आंड्या टॉप फिल्डर होता. त्यानेही एक-दोन मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. वंड्याचीही आता एखादी चांगली ओव्हर पडायला लागली होती.

पण अक्षयची टीम पहिल्यापासून फुल कॉन्फिडंट टीम होती.

आम्ही कॉलेजला एन्ट्री केली. मॅच संध्याकाळची होती. कॉलेजच्या ग्राउंडच्या आजूबाजूला सगळे विद्यार्थी खचाखच भरले होते. आमचं कॉलेज तीन-चार फ्लोअरचं होतं. प्रत्येक फ्लोअरच्या प्रत्येक गॅलरीमध्ये स्टुडंट्स मॅच बघायला उभे होते. बाजूला कॉम्प्युटर लॅब होती, पाठीमागच्या बाजूला जिमखाना होता, समोरच्या बाजूला स्टेज होतं. कॉरिडॉरमध्येही टीचर्स, स्टुडंट्स वगैरे खचाखच भरले होते.

आमच्या BSc ITचे हेड सुद्धा मॅच बघायला उपस्थित होते. कॉलेजच्या प्रिन्सिपलसुद्धा मॅच बघायला आल्या होत्या.

पप्याने सायलीला इन्व्हाईट केलं होतं. त्यामुळे सायली तिच्या काही मैत्रिणींसोबत मॅच बघायला आली होती. क्लासमधल्या ज्या मैत्रिणी होत्या, त्याही मॅच बघायला आल्या होत्या.

वंड्या भयंकर जोशमध्ये होता. भयंकर हॅपी होता. फुल कॉन्फिडन्समध्ये होता. आज काहीही करून सायलीला इम्प्रेस करायचं होतं त्याला.

वंड्या कॉलेज ला सजून धजून आला. आम्ही त्याला बघितला आणि तोंडातच बोट टाकली.

मी पप्याला बोललो हा Match खेळायला आलाय कि लग्नाला आलाय कोणाच्या.

पप्या ने वंड्या ला हाक मारली, तो आला, पप्या म्हणाला “ए मादरचोद Match खेळायची आहे. लग्न नाही लावायचं आहे तूझ.”

तो म्हणाला, अरे घेऊन आलोय कपडे. थांब सायली आली कि नंतर जातो change करायला.

आम्ही बोललो, “आईला हा येडझवा झालाय.”

थोड्या वेळाने पप्या वंड्याला बोलतो, “वंड्या, तुझी आयटम आली. हाक मारू का? कि जातोस तूच तिथे!”

तो बोलतो, “नाही थांब तिला बघू दे मला आधी. मी नाही जाणार डायरेक्ट तिच्या समोर.”

मंग्या बोलतो, “आईझवड्या काळ्याच तोंड बघा आणि ह्याचा atitude बघा!”

सगळे हसायला लागले! पण वंड्या आपल्याच दुनियेत होता.

वंड्या मला बोलतो, “सागऱ्या, आज चमत्कार होऊ दे यार! आज बॉलिंग अशी पडू दे की सहा बॉलमध्ये एक-दोन विकेट निघू दे. अजिबात रन नको जाऊ दे. फिल्डिंग एकदम टॉप-मोस्ट होऊ दे. जमलं तर बॅटिंगचा पण चान्स भेटू दे आणि ती पण चांगली होऊ दे. आणि मॅच जिंकू दे!”

मी त्याला बोललो, “लवड्या तुझी चमडीगिरी संपव आधी आणि Match चे कपडे घालून ये.”

थोड्या वेळाने तो सायली ला वगैरे भेटला आणि Match च्या वेळेला कपडे बदलवून आला.

मी त्याला बोललो, “वंड्या, तू असाच कॉन्फिडंट राहा. आपण मॅच पण जिंकू, सायली इम्प्रेस पण होईल आणि तू प्रपोज पण करशील. बघायला आलीये, शंभर टक्के सांगतो!”

असं म्हणून वंड्याला अजून झाडावर चढवलं.

वंड्या एकदम खुश झाला.

थोड्या वेळाने पप्याने सगळ्यांना बोलवलं. आमची टीम हडल करायला आली. नेहमीच्या पॅटर्ननुसार आम्ही टॉस हरलो होतो आणि आम्हाला पहिली बॅटिंग दिली होती.

ओपनिंगला मी जाणार होतो. माझ्यासोबत पप्या होता. पप्याच्या नंतर नेहमीप्रमाणे मंग्या येणार होता. त्यानंतर आंड्या आणि मग बाकीची टीम.

आमची बॅटिंग सुरू झाली.

त्या मॅचमध्ये माझा परफॉर्मन्स चांगला झाला. मी ५५ रन केले होते. पप्यानेही चांगली बॅटिंग केली आणि पाच ओव्हरमध्ये आम्ही ११३ रन केले. आमच्या चार विकेट पडल्या होत्या. वंड्याला काही batting भेटली नाही. तिसऱ्या विकेट नंतर आला पण non strike लाच होता.

आमची बॅटिंग संपली.

आता आमची फिल्डिंग आणि बॉलिंगची वेळ आली.

पुन्हा एकदा आम्ही हडल केलं. बॉलिंगचा सेम पॅटर्न होता. पहिली ओव्हर मी टाकणार होतो. दुसरी ओव्हर पप्या, तिसरी वंड्या, चौथी मनीष आणि पाचवी पुन्हा मी.

वंड्याची ओव्हर

मी पहिली ओव्हर टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये मी वीसच्या आसपास रन दिले होते. एक्झॅक्ट नंबर आता आठवत नाही, पण वीसच्या आसपास होते.

दुसरी ओव्हर पप्याने टाकली. पप्याची ओव्हर जबरदस्त झाली.

आता तिसरी ओव्हर होती.

वंड्या बॉलिंगला आला.

वंड्या फुल कॉन्फिडन्समध्ये होता. मी त्याच्याजवळ गेलो आणि बोललो, “वंड्या, सेमीफायनलला जसा पराक्रम केला आहेस, सेम परफॉर्मन्स, सेम पराक्रम आता या मॅचमध्ये पण कर. बेस्ट ऑफ लक!”

सगळे त्याच्याजवळ आले.

“बेस्ट ऑफ लक वंड्या!”

“सायली बघतेय. चांगला परफॉर्मन्स दे!”

“चांगली बॉलिंग टाक. नो-बॉल, वाईड वगैरे काय टाकू नको!”

त्याला फुल इम्प्रेस करायचं होतं.

अक्षयलासुद्धा माहीत होतं की सायली आली आहे.

वंड्याची ओव्हर सुरू झाली.

आणि अक्षयच्या टीमने वंड्याला चांगलाच धुतला!

त्याचे सारखे नो वाइड पडत होते. बॉल एकदम बॅटवर जात होते. अक्षय टॅप वर टॅप मारत होता. वंड्या प्रेशर मध्ये आला होता, त्याची लाइन length बिघडली होती.

तीन सलग वाइड पडल्यावर मी त्याच्या जवळ गेलो, त्याला बोललो “वड्या प्रेशर नको घेऊ. जाऊदे फोर वगैरे फक्त नो वाइड नको टाकूस. मोठा श्वास घे आणि फोकस कर. सायली वगैरे चा विचार नको करुस.”

पण परत त्याने No टाकला आणि फोर गेला.

मंग्या आला माझ्या जवळ आणि बोलला “कोणती अवदसा सुचली ह्याला आणि ह्याने सायली ला बोलावलं. हा हा. त्याच तोंड बघ कुत्र्याच्या आवळलेल्या गांडीसारखं झालंय. मोर पिसारा फुलवतो पण त्याची उघडी गांड कोणाला दिसत नाही हा पिसारा फुलवायला गेला पण ह्याची फक्त गांडच उघडी पडली आहे.”

मला हसायला आलं पण मी मंग्याला बोललो “थांब जरा आता कशी बशी ह्याची ओव्हर संपवू दे.”

ओव्हर संपली. त्या एकाच ओव्हरमध्ये अक्षयच्या टीमने जवळपास ४५-५० रन मारले. आणि वंड्याची ती बोनस ओव्हरपण नव्हती! त्या सहा बॉलमध्ये वंड्याने नो-बॉल टाकले, वाईड टाकले, फोर गेले. असे बॉल टाकले की फिल्डरच्या हातातसुद्धा येणार नव्हते.

अक्षयने वंड्याला अक्षरशः धुतला.

वंड्याचा चेहरा अक्षरशः पडला होता.

अक्षयही वंड्याकडे बघत होता आणि त्यालासुद्धा बहुतेक वाईट वाटत होतं—सायली आली आणि आज वंड्याला आपणच झोपवलं!

आम्ही सगळे वंड्याकडे आलो. एकदा वंड्याकडे बघतोय, एकदा सायलीकडे बघतोय. सायलीच्या मैत्रिणी हसत होत्या आणि इकडे वंड्याचा चेहरा पूर्ण पडला होता.

पप्या बोलतो, “लवड्या संपवायची होतीस ना ह्याच ओव्हरला Match. कशाला ठेवले बाकीचे रन. भेंचोत, याला बोललो होतो बोलवू नको! तरी याने बोलवायला लावलं. मला वाटलेलंच हा प्रेशर मध्ये हागणार म्हणून.”

वंड्याचा चेहरा अगदी रडवेला झाला होता.

मी आणि आंड्या त्याच्याजवळ गेलो आणि बोललो, “भोसडीच्या, जाऊ दे. आता ओव्हर पडली, गेली, झाली. खराब झाली तर झाली. आता मॅच जिंकायची आहे आपल्याला. मॅच जिंकलो तर हे सगळं विसरून जातील. आता पुढचा फोकस फिल्डिंगवर ठेव. ती सोडू नको. नाहीतर अजून इज्जत जाईल. या स्ट्रेसमध्ये फिल्डिंग पण खराब करू नको.”

तो केविलवाणा होऊन बोलला, “हा, नाही. आता फिल्डिंग चांगली करतो मी.”

मी पप्याकडे बघतोय, पप्या माझ्याकडे बघतोय, मी मंग्याकडे बघतोय. आम्ही एकमेकांकडे बघून हसत होतो. वंड्याचा चेहरा बघून आम्हाला हसूही आवरत नव्हतं. वंड्याचा बाजार उठला होता.

मनीषने चौथी ओव्हर चांगली टाकली. बोनस ओव्हर घेऊनसुद्धा त्याने जास्त रन दिले नाहीत.

चार ओव्हरमध्ये त्यांचे १०० रन झाले होते.

आता मॅच जवळपास आमच्या हातातून गेली होती.

शेवटची ओव्हर: मॅचचा थरार

शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना जिंकायला फक्त १४ रन हवे होते.

आणि शेवटची ओव्हर माझी होती.

त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता. विराट कोहलीला २०२२ ला मेलबर्नच्या ग्राउंडवर आठ बॉलमध्ये २८ रन पाहिजे असताना जे वाटलं असेल ना, जवळपास तशीच फिलिंग मला त्या क्षणी हातामध्ये बॉल घेतल्यानंतर येत होती.

कॉलेजचे तिन्ही-चारही फ्लोअर स्टुडंट्सने भरले होते. प्रत्येक फ्लोअरवर मुलं मॅच बघत होती. ग्राउंड फ्लोअरवर चारी बाजूंनी स्टुडंट्स, टीचर्स, प्रिन्सिपल सगळे जमले होते.

याआधी ITची टीम कधीच फायनलपर्यंत गेली नव्हती. आमची पहिली टीम होती जी फायनलपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे ITची सगळी मुलं आम्हाला चिअर करत होती. आमचा पूर्ण वर्ग उभा होता.

तिकडे कॉमर्ससाठी हे नवीन नव्हतं. जवळपास दरवर्षी TYBComची टीम वगैरे जिंकायची.

पप्या आणि आंड्या माझ्या जवळ आले, “सागऱ्या भेन्चोद काहीही करून ओव्हर चांगली टाक, वंड्या हागलाय तू नको हागूस आता.”

मी म्हणालो, “आयला काही ठेवलंच नाहीये डिफेन्ड करायला. तो अक्षय सेट झालाय पार.”

आम्ही एक शेवटची टीम हडल घेतली, गणपती बाप्पा मोरया ची घोषणा दिली आणि फिल्डिंग सेट केली.

मी बॉल हातात घेऊन बॉलिंगच्या सेक्शनमध्ये आलो.

एकदा चौफेर बघितलं.

भयंकर गोंगाट होता.

माझ्या डोक्यात विचार चालू होता—फक्त १४ रन पाहिजेत. मॅच जवळपास हातातून गेली आहे. ही ओव्हर काहीही करून चांगली पडली पाहिजे.

मी अक्षयकडे बघितलं. तो बॅटिंग करत होता. त्याच्या डोक्यातही तेच चालू असावं, हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून जाणवत होतं.

दोन क्षणांसाठी मी डोळे बंद केले.

मनात एकच विचार केला—काहीही करून ही ओव्हर चांगली टाकायची.

अक्षयकडे बघितलं. तोसुद्धा देवाला हात वगैरे जोडत होता.

मी बॉलिंगला सुरुवात केली.

पहिले पाच बॉल मी खूप चांगले डिफेंड केले. आंड्याने बाऊंड्रीवर अप्रतिम फिल्डिंग केली. डाईव्ह मारून बॉल अडवले. पहिल्या पाच बॉलमध्ये आम्ही फक्त दहा रन दिले.

आता शेवटच्या बॉलवर त्यांना जिंकण्यासाठी चार रन पाहिजे होते.

११४ रन जिंकायला हवे होते.

शेवटचा बॉल.

मी पप्याला आणि आंड्याला दोघांना बोलवलं.

दोघांना बोललो, “भाई, काहीही करा. त्यांना चार पाहिजेत. बॉल सुटला नाही पाहिजे.”

मला दोघांवरही कॉन्फिडन्स होता. पप्या ॲथलीट होता आणि त्याची फिल्डिंग चांगली होती. आंड्याने आधीच एवढी जबरदस्त फिल्डिंग केली होती की त्याच्या कमरेला दोन ठिकाणी खरचटलं होतं.

पण मला त्याच्यावर विश्वास होता.

शेवटचा बॉल हातात घेऊन मी बॉलिंगला उभा राहिलो.

समोर अक्षय होता.

मी पुन्हा एकदा त्याच्याकडे बघितलं.

एक क्षण डोळे बंद केले.

आणि अचानक पूर्ण ग्राउंडमधून येणारा तो आवाज माझ्यासाठी एकदम शांत झाल्यासारखा वाटला.

मी फोकसच्या एका वेगळ्याच लेव्हलवर पोहोचलो होतो. मला काही ऐकू येत नव्हतं. ती एक क्षणाची Peak असते ना, ती Peak मला जाणवत होती.

सगळं एकदम शांत.

मी अक्षयकडे बघितलं.

अक्षयसुद्धा त्याच स्टेटमध्ये होता. फक्त बॉलकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हती, तो हसत नव्हता. एकटक माझ्या हातातल्या बॉलकडे बघत होता.

त्याच्या हातात बॅट.

माझ्या हातात बॉल.

मी अक्षयकडे बघत होतो.

तो माझ्याकडे.

मी पूर्ण जोर लावून बॉल टाकला.

यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला, पण बॉल थोडासा पाठीमागे पडला.

अक्षयने एकदम जोरात शॉट मारला. त्याला चार रन पाहिजे होते, त्यामुळे त्याने पूर्ण ताकदीने बॅट फिरवली.

बॉल एकदम सरळ गेला.

मी स्टम्पच्या एका बाजूला उभा होतो आणि बॉल स्टम्पच्या दोन इंच बाजूने एकदम सरळ, जोरात गेला.

इकडून आंड्या आणि पप्या दोघांनी डाईव्ह मारली.

बॉलचा स्पीड इतका होता की आंड्याच्या हाताला, अगदी बोटांना बॉल टच झाला…

आणि बाऊंड्री गेली.

पराभव आणि फायनलची शेवटची आठवण

आम्ही मॅच हरलो.

पूर्ण ग्राउंडमध्ये एकच जल्लोष झाला. कॉलेजमध्ये कॉमर्सचे स्टुडंट्स जास्त असल्यामुळे कॉमर्ससाठी जोरदार टाळ्या वाजत होत्या.

आमच्या ITची जी मुलं होती, ती एकदम शांत झाली.

पण आमच्या सरांनी, मॅडमनी आम्हाला काँग्रॅच्युलेट केलं.

“खूप चांगली मॅच झाली.”

“परफॉर्मन्स खूप चांगला होता.”

सगळ्यांनी आमचं कौतुक केलं. मित्रांनी डोक्यावर वगैरे घेतलं. थोडासा जल्लोषही झाला.

पण जिंकल्यानंतर जो जल्लोष झाला असता ना, तो अनुभवता नाही आला.

त्यानंतर आम्ही अक्षय वगैरे यांच्या टीमसोबत हात मिळवले. एकमेकांना काँग्रॅच्युलेट केलं. सोबत फोटो वगैरे काढले.

आणि इकडे वंड्याचा चेहरा अजूनही पार पडलेला होता.

कारण वंड्या त्या मॅचमध्ये फार हागला होता!

वातावरण थोडं शांत झाल्यानंतर आम्ही वंड्याजवळ गेलो.

त्याला बोललो, “सायलीला विसर आता, स्वतःहून गांड मारून घेतलीस तू. हा हा हा. काय विचार करत असेल ती तुझा? आयला वड्या तू तिच्या समोर कसा जाणार रे? ती तिच्या मैत्रिणीला बोलेल ए ह्याला शिवू नका हा Match मध्ये हागला होता. आम्ही तुझ्या जागी असतो तर महिनाभर तरी तिच्या समोर नसतो गेलो.”

वंड्या बोलतो, “यार, मी काय प्लॅन करून आलो होतो आज! परफॉर्मन्स चांगला होईल, आज प्रपोज वगैरे करेन. आईशप्पथ, आज असा परफॉर्मन्स झालाय की मला आता तिच्यासमोर पण जायची हिंमत होत नाहीये.”

आणि अशा प्रकारे ती फायनल मॅच संपली.

आम्ही फायनल हरलो होतो.

पण त्या शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या मॅचचा जो थरार, वंड्याची लागलेली वाट, तो आजही तसाच आठवतो.

First match scorecard

×